थायलंडचा राजा परदेशात, जनता मात्र क्लेशात
पर्यटनावर अवलंबून असलेल्या थायलंडच्या अर्थव्यवस्थेवर कोविड-१९च्या महामारीने मोठीच आफत आणली आहे. अर्थव्यवस्था वेगाने ढासळत आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. म्हणून तरुणांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. त्यावर सध्या तरी कोणताही उपाय दिसत नाही. संपूर्ण देश कोविड-१९शी लढत आहे, पण या थायलंडच्या राजाने आपल्या अनेक राण्यांसह स्वत:ला जर्मनीच्या पर्वतराजीतील आलिशान बंगल्यात विलगीकरणात ठेवले आहे.......